Apple Stole My Music. No, Seriously. — Discover

“What this means, then, is that Apple is engineering a future in which rare, or varying, mixes and versions of songs won’t exist unless Apple decides they do.” A freelance composer discovers that Apple Music deletes music files from his hard drive.

via Apple Stole My Music. No, Seriously. — Discover

हल्ल्यांचा भरतो भला बाजार

ठाक ठाक आवाज होतो,

रक्ताचं थारोळं साचतं,

मग माईक घेऊन हातात,

कुणीतरी नाचनाच नाचतं.

 

माईकच्या समोर मग,

लोकशाहीच्या त्याच फैरी झडतात,

माणूस मरतो म्हणे पण,

विचार कधी मरत नसतात.

 

काही जातीधर्मांचे मुखीये,

वैयक्तिक खुन्नस काढतात,

आमचा मेला नाही म्हणत,

विरोधक गाढगुडूप झोपतात.

 

चार दिवस नुसती धमाल,

हल्ल्यांचा भरतो भला बाजार,

मग आम्हीही पार विसरतो,

विसरणे हा आमचा पारंपारिक आजार.

 

खून,हल्ले,धमक्यांच्या फायलींनी,

ते जळके मंत्रालय काठोकाठ भरले,

फायलींच्या अवाढव्य ढिगाऱ्यावर,

उंदीरही हसत हसत खुशाल मुतले.